अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची परखड मुलाखत मी घेतली आहे.
नागपूर येथे घेतलेल्या या मुलाखतीत बडोदा येथे होणार्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाविषयी आणि अ. भा. मराठी आहित्य महामंडळाच्या कार्याविषयी सविस्तर विचारमंथन आहे.
साहित्यसंमेलन आणि त्यावर होणारे वाद ही गोष्ट सातत्याने घडणारी आहे. बडोदा येथील संमेलनाविषयीच्या अनेक वादग्रस्त प्रश्नांना डॉ. जोशी यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
अ. भा. मराठी साहित्य संमेमन बहुसांस्कृतिक व्हावे, सर्व पुरोगामी प्रवाहांशी सुसंवादी व्हावे, साहित्य महामंडळाचे कामकाज अधिक संवादी व लोकशाहीयुक्त व्हावे अशी अपेक्षा या मुलाखतीत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचाअ दर्जा देण्याच्या मागणीमध्ये प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी अशी अपेक्षा या मुलाखतीत आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही मुलाखत आवर्जून वाचा.